in ,

सचिन तेंडूलकरकडून ‘मिशन ऑक्सिजन’साठी 1 कोटी रुपयांची मदत

(FILES) In this file photo taken on May 6, 2017, Indian cricket legend Sachin Teldulkar poses for a photograph during a photocall at the Oval cricket ground in south London. - Tendulkar entered hospital on April 2, 2021 as a precautionary measure after testing positive for Covid-19 coronavirus. (Photo by Niklas HALLE'N / AFP)

ऑक्सिजनची भयंकर टंचाई पाहता भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पुढे सरसावला आहे. सचिनने ‘मिशन ऑक्सिजन’साठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

सचिन तेंडूलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही सचिनने अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता.

मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत करत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली. तसेच, ‘मी खेळत असतााना तुमच्याकडून मिळालेला पाठिंबा अमूल्य होता, त्यामुळे मी यश मिळवू शकलो.आज आपण करोनाविरोधात लढणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आहे’, अशा आशयाचा संदेशही यावेळी त्याने दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Update | 24 तासांत साडेतीन हजार जणांनी गमावले प्राण

गरजेपेक्षा जास्त वाटप केलेले रेमडेसिवीर परत घ्या