मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून मनसुख हिरन प्रकरणी तपासाचा भाग म्हणून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नेण्यात आले होते. यावेळी एनआयए टीमसोबत पुणे येथील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) येथील तज्ज्ञही हजर होते, अशी माहितीही मिळाली आहे.
सोमवारी रात्री उशिरा एनआयएचं पथक वाझे यांना घेऊन थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहचलं. मनसुख हिरन मृत्यू प्रकरणी सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने वाझे यांना सीएसएमटी येथे नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सचिन वाझे यांना घेऊन एनआयएच्या गाड्या थेट प्लॅटफॉर्मच्या जवळ गेल्या होत्या, असे व्हिडिओत दिसत आहे. लोकलच्या बाजूने वाझे चालत आहेत. त्यांच्याभोवती एनआयए पथकातील अधिकारी आहेत. त्यांच्याकडून वाझे यांना काही प्रश्न विचारले जात आहेत, असेही दृष्यांमधून स्पष्ट होत आहे. वाझे यांना प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर नेण्यात आले होते. हा प्लॅटफॉर्म आधीपासूनच रिकामा करण्यात आला होता, असेही सूत्रांनी सांगितले.
Comments
Loading…