अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. या सर्व प्रकरणाची एनआयए कसून तपास करीत आहे. या तपासात त्यांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. सचिन वाझे हे मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात काही दिवस मु्क्कामाला होते, असे समोर आले आहे.
सचिन वाझे हे ट्रायडंट हॉटेलमध्ये बनावट आधार कार्डच्या साहाय्याने राहत होते. ट्रायडंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सचिन वाझे आणि एक महिला दिसत असल्याचा एनआयएने दावा केला आहे. त्यांच्याकडे त्यावेळेस 5 बॅग असल्याचेही समोर आले आहे. वाझे यांच्यासोबत जी महिला आहे, तिच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन असल्याची माहिती एनआयएने दिली आहे.
ट्रायडंट हॉटेलमधील काही सीसीटीव्ही फुटेज देखील एनआयएने ताब्यात घेतले आहे. याच अनुषंगाने एनआयएकडून आज स्टाफची चौकशी करण्यात येणार आहे.
Comments
Loading…