in ,

घटस्फोटानंतर समांथा अक्किनेनीने तोडली चुप्पी

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य विवाहानंतर ४ वर्षांनी विभक्त झाले आहेत. त्यांच्या नात्यात कटुता का आली, याचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. मात्र याबाबत अनेक उलटसुलट चर्चा ऐकायला येत असुन अनेकांनी तर्कवितर्क लावले आहेत. समांथाने २०० कोटी पोटगी नाकारली. मात्र घटस्फोटामुळे नेटकरी तिच्या चारित्र्यावर टीका करत आहेत. अखेर समांथाने या सर्वांबाबत चुप्पी तोडली.

समांथा अक्किनेनीने एका नोटच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला . ती म्हणाली ‘माझ्या खासगी जीवनात आलेल्या या वादळामध्ये तुमच्या भावनिक सहभागाने मला आधार दिला आहे. तुमच्या सहानुभूतीसाठी मी आभारी आहे. ज्यामुळे मी अफवा आणि वाईट भावनांविरोधात उभी राहू शकले. ते म्हणतात की माझी काही प्रेम प्रकरणे होती, मला बाळ नको हवे होते, मी संधी साधू आहे आणि आता तर असेही म्हटले जात आहे की अनेकदा माझा गर्भपातदेखील झाला आहे. घटस्फोट ही अतिशय वेदनादायी प्रोसेस आहे. मला एकटीला यातून सावरण्यासाठी वेळ हवा आहे. माझ्या चारित्र्यावर असा हल्ला करणे चुकीचे आहे. परंतु, मी वचन देते की यापैकी कोणत्याही गोष्टीला आणि कोणालाही मी माझे आत्मबळ तोडू देणार नाही.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर समांथा शेवटची द फॅमिली मॅन २ मध्ये झळकली होती. यात तिने राजीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळाली. त्यानंतर आता ती शाकुंतलममध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुना शेखर यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरू आहे का?, आशिष शेलारांचा घणाघात

मला कोणतीही नोटीस आली नाही – रवी राणा