in

Maratha Reservation: “संभाजीराजे माझे बंधूच, हे त्यांचेच घर कधीही यावं”

मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे यांनी अनेक बड्या नेतेमंडळीची भेट घेतली आहे.मात्र अद्याप त्यांनी उदयनराजे यांची भेट घेतली नव्हती. आज या दोन बड्या नेत्यांची भेट होण्याची चर्चा आहे. या भेटीवर आता उदयनराजे यांनी मौन सोडले आहे.

मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान संभाजीराजे उदयनराजेंची भेट घेणार असल्याची चर्चा रंगली होती. या भेटीसंदर्भात बोलताना उदयनराजे म्हणाले, “माझ्या अगोरदच काही भेटीगाठी काही ठरल्या होत्या. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ अधिकाऱ्यांसोबत रस्त्याबाबतच्या दुरुस्तीसाठी आज महत्वाची बैठक आहे. माझ्या पूर्वनियोजित भेटी असल्याने आज आमची भेट होऊ शकणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

“ते माझे बंधू आहेत. तुमचं घर आहे तुम्हीही कधीही येऊ शकता असं मी त्यांना सांगितलं आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात मी त्यांच्यासमवेत आहे. आम्ही भेटणार आहे. फक्त दोन तीन दिवसांतील पूर्वनियोजित भेटीगाठी संपल्या की आम्ही भेटू. त्यावेळी चर्चेतून चांगलं काहीतरी घडेल,” असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.

पुणे ते मुंबई ‘लाँग मार्च’

मराठा आरक्षण प्रश्नी १६ जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर पुढे पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात परवाना संपलेल्या मेडिकलवर कारवाई

भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीला अमेरिकेत परवानगी नाकारली