कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे शासनाने रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू केलेली आह. याच काळात अनेक निर्बंध देखील लागू केले आहेत. हे निर्बंध हॉटेल व्यावसायिकांसाठी जाचक आहेत, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आज ओशिवरा येथे संजय निरुपम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आणि हॉटेल व्यावसायिक बरोबर सरकार विरोधात निदर्शने केली.
आघाडी सरकारला घरचा आहेर देत दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. आता लॉकडाऊन नको, लोकांमुळे बेरोजगारी बेकारी वाढत असल्याचे सूचक विधान देखील संजय निरुपम यांनी केले.
Comments
Loading…