in

”गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही, ही अस्मितेची लढाई”

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत आज बेळगावात दाखल झाले आहेत. यावेळी राऊत यांच्या सभेची धास्ती घेत बेळगावात प्रशासनाकडून स्टेज, साऊंड सिस्टिम काढण्यासाठी दादागिरी करण्यात आल्याची घटना घडली आहे. यावेळी गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही सभा होणारच, ही अस्मितेची लढाई असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपचे राज्यमंत्री सुरेश अंगडिया यांच्या निधनामुळे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणूकीतील महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ संजय राऊत बेळगावात दाखल झाले आहेत. हि प्रचारसभा सायंकाळी साडेसात वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार येथे होणार आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांची बेळगावात तोफ धडाडणार आहे.

या सभेची धास्ती घेत बेळगावात प्रशासनाकडून स्टेज, साऊंड सिस्टिम काढण्यासाठी दादागिरी करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवर संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले असल्याचे सांगत कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात झाल्याची टीका संजय राऊत यांनी केली. दरम्यान गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही,सभा होणारच! ही अस्मितेची लढाई असल्याच्या इशारा यावेळी राऊत यांनी दिला.

पोटनिवडणूक

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी शिवसेनेने उमेदवारी मागे घेत महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dr. BAMU University Exams |विद्यापीठाचा मोठा निर्णय,परीक्षा पुढे ढकलल्या

SRH vs RCB | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सनरायझर्स हैदराबादशी आज भिडणार