in

दिल्लीत राजकीय भेटींना वेग… संजय राऊत शरद पवारांसोबत उपराष्ट्रपतींकडे रवाना

मागील अनेक दिवसांपासून दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय.

सध्या शरद पवार यांची राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत. यानंतर दोघेही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकत्र रवाना झाले. संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैला सुरू होणार आहे. 13 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्लीत नेत्यांची रेलचेल सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीला महत्त्व आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सातत्याने काँग्रेस आक्रमक होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार वेगळं समीकरण जुळवतात का, असा तर्क लढवला जात आहे.

शरद पवार आणि मोदींच्या भेटीवर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, यावेळी संजय राऊत यांनी भाजपाच्या मनात काही दुःख आहे, वेदना आहेत ते त्यांना आमच्याकडे मोकळं केलं पाहिजे, असं देखील बोलून दाखवलं.

“या भेटीबाबत आश्चर्य वाटावं, धक्कादायक असं काय आहे? शरद पवार हे देशाचे माजी कृषीमंत्री, संरक्षणमंत्री आहेत. सहाकार क्षेत्रातील दिग्गज असं ते नेतृत्व आहे. अशा एखाद्या प्रश्नासाठी शरद पवार हे त्यांना भेटले असतील. मलाही कल्पना होती, आम्हाला सगळ्यांना कल्पना होती की सध्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात जे सुरू आहे. काही सूडाच्या कारवाया त्या संदर्भात लवकरच शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटून जी काही तथ्य आहेत, या क्षेत्रातील त्या सांगण्याची शक्यता आहे असं मलाही वाटत होतं आणि त्यांनी सांगणं गरजेचं सुद्धा होतं, असं राऊत यांनी म्हटलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कळंबणीत ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप

प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज?’भोंगा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला