in

रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?; सामनातून टोलेबाजी

पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. याचपाश्वर्भूमीवर सामना अग्रलेखातून गुजरात राज्य जर विकास , प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते , तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे गुजरातमधील बदलांवरून सामनातून टोलेबाजी करण्यात आली.

भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘ मॉडेल ‘ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की , मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात . भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय ? असो खोचक सवाल सामनातून करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्री स्वामी समर्थ मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिर मागे, दलाल निवास, रूम नं. ३, मु.पो. ता.शहापूर, जि. ठाणे

Heavy Rain Kolhapur | नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर