in

‘…अन्यथा या देशात मुडद्यांचं राज्य’

‘राष्ट्रीय स्तरावर आपत्ती आहे. केंद्र सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसेल वा त्यांचंही नियंत्रण सुटलं आहे. तर हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर एक समिती नियुक्त केली पाहिजे. ती समिती यावर काम करेल म्हणजे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. केंद्राकडून याचं नियंत्रण होणं गरजेचं आहे.

राजकारणविरहीत काम केलं, तरच हा देश वाचेल नाहीतर या देशामध्ये फक्त मुडद्यांचं राज्य राहिलं,’ असं इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला. त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला.

‘महाराष्ट्राची जनता दोन वर्षांपासून संकटात आहे. महाराष्ट्राला लढण्याची, संकटाचा मुकाबला करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढाई सुरू केली आहे. यातून नक्की आपण बाहेर पडू. पुढील महाराष्ट्र दिन आपण नेहमीच्या उत्साहात साजरा करू, अशा शुभेच्छा देतो,’ असं राऊत म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘महाराष्ट्रानं अनेक अस्मानी-सुलतानी संकटाला तोंड दिलं, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत’

कोरोनाविरोधातील लढाईत चीनचा भारताला मदतीचा प्रस्ताव