in

‘सरकारवर शिंतोडे उडाल्याचं मान्य करतो’

शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांसदर्भातील पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामुळे सरकारवर शिंतोडे उडाले आहेत हे मान्य करतो, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

सर्वांनी एकजुटीनं बसून विचार करायला हवा. राज्यकर्त्यांनी कणा मजबूत ठेवणं गरजेचं असतं. मी याप्रकरणी शरद पवारांशी सविस्तर बोलणार आहे. आज दिल्लीला मी पवारांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

सरकारमधील प्रत्येक व्यक्तीनं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सरकारवर शिंतोडे उडाले असल्याचं मान्य करतो, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. गृहमंत्री देशमुखांनी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर यांनी केला आहे. परमबीर यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्सुनामी आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंह लेटर बॉम्बप्रकरणी नवा ट्विस्ट, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण, म्हणाले…

गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा – तृप्ती देसाई