in

‘महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात मराठी उमेदवारांविरोधात प्रचाराची बेईमानी करू नये’

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. काल (बुधवारी) राऊत यांचा रोड शो झाला. तसंच राऊत यांच्या सभास्थळी तोडफोडही करण्यात आली होती. दरम्यान, आज (गुरुवारी) राऊत यांनी बेळगावातून माध्यमांशी संवाद साधला.

बेळगावातील मराठी भाषिकांचा संघर्ष सर्वात जुना म्हणजे गेल्या 65 वर्षांपासूनचा आहे. केंद्र न्याय देत नाही. कर्नाटक राज्य सरकार दडपशाही करतं आहे. इथं निवडणुका जिंकत नाही तोपर्यंत आपली ताकद वाढणार नाही, असंही राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी कडक शब्दांत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. आम्हाला वाकडी पावलं टाकायला लावू नका, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊन मराठी नेत्यांविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये. महाविकास आघाडी सरकार असं करणार नाही. भाजपच्या नेत्यांची यात भावनिक गुंतवणूक नाही. मराठी माणसाची एकजूट होतीये. त्यात मिठाचा खडा टाकू नये. ही मातृभाषेची लढाई आहे, असंदेखील राऊत यांनी स्पष्ट केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खाकी वर्दीला कोरोनाचा विळखा; परभणीत 112 पोलिसांना कोरोनाची लागण

खासदार भावना गवळींचं मोदींना पत्र…