in ,

‘भगव्याला हात लावाल तर दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना इशारा

बेळगाव लोकसभा पोडनिवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज बेळगावात दाखल झाले होते. यावेळी घेतलेल्या प्रचारसभेत संजय राऊत यांनी ‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, अशा खरमरीत शब्दात बेळगावमधील प्रशासनाला आणि कन्नडिगांना सुनावले.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारसभेच्या भाषणात राऊत यांनी महाराष्ट्राने मनात आणलं आणि फक्त पाणी बंद केलं तर तडफड होईल. पण आम्ही तसं करत नाही. कारण आम्ही माणुसकी बाळगतो असा इशाराही कन्नडिगांना दिला.

बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे इथं आता माकडांचं काम नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपाला सुनावले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची ज्योत शुभमच्या निमित्तानं पुन्हा पेडल्याचं सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळकेला विजयी करण्याचं आवाहन राऊतांनी बेळगावातील मतदारांना केलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona : राज्यात आज 59 हजार नवे कोरोना रुग्ण

SRH vs RCB | बंगळुरुचा ‘रॉयल’ विजय