in

दिग्दर्शक संजीव कोलते घेऊन येतायत ”अशी ही भन्नाट भिंगरी”

रंगकर्मी, कॅम्पस कट्टा, तानी यांसारख्या उत्कृष्ट सिनेमांनतर प्रसिद्ध दिग्दर्शक संजीव कोलते आता नवीन सिनेमा घेऊन आले आहेत. अशी ही भन्नाट भिंगरी असे या सिनेमाचे नाव असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

ब्राम्हण मुलगा आणि आगरी मुलगी यांचा रोमॅंटीक असा हा चित्रपट जानेवारी २०२० उरण मध्ये चित्रित झाला. मात्र लॅाकडाउनमुळे चित्रपट प्रदर्शित करण्यात काही अडचणी आल्या, पण आता सिनेमागृह उघडल्यानंतर लगेचच हा चित्रपट प्रदर्शित होईल असे चित्रपटाचे निर्माते जनार्दन म्हसकर पाटील यांनी म्हटले आहे. या चित्रपटात हेमांगी राव, नंदू गाडगीळ, निशा परुळेकर आणि अरुण नलावडे यांसारख्या नावाजलेल्या अभिनेत्यांचे काम पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात प्रफुल म्हसकर आणि अश्विनी सुरपूर हे नवीन चेहरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तसेच श्रुती गव्हाणे, लिलाधर अनभुले, निकिता सावंत, हिमांशू कुलकर्णी, हे नवीन चेहरे सहाय्यक भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तसेच जनार्दन म्हसकर, मीनल गावडे आणि ह्रीदान जगदीश हे तिघे खलनायकाची भूमिका साकारणार आहेत

या चित्रपटाचा आत्मा हे त्याचे संगीत असून प्रसिद्ध गायक आणि संगीतकार प्रवीण कुंवर यांनी या चित्रपटाला संगीत दिले. गीतकार परशुराम बागडे, कौतुक शिरोडकर यांनी ती उत्कृष्ट गाणी लिहिली असून वैशाली माडे, भारती मढवी, हर्षवर्धन वावरे या गायकांनी सुरेल गीत गायली आहेत. तसेच या सिनेमाचे छायांकन रवी राजपूत आणि निर्मिती व्यवस्थापनाची धुरा सदाशिव चव्हाण यांनी संभाळली आहे श्री साई समर्थ चित्र या प्रोडक्शन यांची निर्मिती असलेला संजीव कोलते दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दारुड्या पत्नीचा पतीनेच केला खून

Maharashtra Corona; दिलासादायक! ॲक्टिव्ह रुग्ण संख्या घटली