in ,

पुणेकरांना दिलासा ! ससूनमध्ये आणखी 300 बेड्सची क्षमता वाढणार

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. त्यामुळे आरोग्य सेवा ही अपुरी पडताना दिसते आहे. त्यामुळे आरोग्य सेवा वाढविण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्याच्या ससून रूग्णालयात आणखी 300 बेड्स कोरोना बाधितांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ससून रूग्णालयाचे डीन डॉ. मुरलीधर तांबे आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज ससून रुग्णालयातील आरोग्यसेवेचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर झालेल्या बैठकीत ससून रूग्णालयात आणखी 300 बेड्सची क्षमता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ससूनमधील कोविड बेड्सची संख्या 500 वरून 800 वर गेली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

30 हजार अँटिजन टेस्ट किट प्राप्त

दुसरीकडे पुणे जिल्हा प्रशासनाला 30 हजार अँटिजन टेस्ट किट प्राप्त झाल्या आहेत. पुढील 3 दिवसांत ग्रामीण भागात कोरोना चाचण्या करण्यासाठी हे किट मागवण्यात आले होते. जिल्ह्यातील 234 हॉटस्पॉटमध्ये या चाचण्या केल्या जाणार आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागातही कोरोना स्थिती अधित चिंताजनक बनत चालली आहे. अशावेळी ट्रेसिंग आणि टेस्टिंगची गती वाढवण्यासाठी प्रशासनानं या किट मागवल्या होत्या, तशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Stock Market | मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाकां 259 अंकांनी वधारून 48,803 वर बंद झाला

शिवसेना आता बाळासाहेबांची राहिली नाही; देवेंद्र फडणविसांची शिवसेनेवर सडकून टीका