in , ,

जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर झाला पसार..

जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोराने पळ काढला असल्याची घटना घडली आहे. मुंबईतील दादर शिवाजी पार्कात ही घटना घडली असून शिवाजी पार्क पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तेथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराची ओळखही पटली असून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे.

सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अभिनेत्री सविता मालपेकर शिवाजी पार्कात फेरी मारून तेथील कट्ट्यावर बसल्या असताना त्यांना वेळ विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आरोपी आला आणि त्यांच्या गळ्यातील चेन त्याने खेचली या झटापटीत त्यांचे कपडे ही फाटले, तसेच त्यांच्या मानेवर किरकोळ जखम ही झाली. यावेळी त्यांनी तिथे आरडाओरडा सुरू केला असता जवळ असलेल्या स्थानिकांनी त्यांना मदत केली.

शिवाजी पार्कात हे वर्दळीचे ठिकाण आहे. मात्र याठिकाणी सीसीटीव्ही फक्त प्रवेशदाराजवळच असून जेष्ठ नागरिक, लहान मुलं, महिला यांची गर्दी याठिकाणी असते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इगतपुरीत मुसळधार… धरणात मुबलक पाणीसाठा

भिवंडीत सकाळ पासून मुसळधार पाऊस, रस्ते पाण्याखाली