in

चंद्रपुरात दुसरा दीक्षा सोहळा

अनील ठाकरे | चंद्रपूर | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात लाखो बौद्ध बांधवाना ऐतिहासिक दीक्षा दिल्यानंतर देशातील केवळ दुसरा दीक्षा सोहळा चंद्रपुरात पार पडला. चंद्रपूरला आयोजित झालेल्या या घटनेचे स्मरण म्हणूनच दरवर्षी १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. यंदाचे हे ६५ वे वर्ष आहे.

मात्र सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे हे स्थळ प्रशासने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळॆ चंद्रपूरात राज्यातून लाखो बौद्ध बांधवाना पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे. इथे होणारे सर्व कार्यक्रम प्रशासनाने रद्द केले असून फक्त लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या बौद्ध बांधवाना दर्शन घेण्याकरीता परवानगी देण्यात आली. अशी माहिती स्थानिक जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे. यंदाचे हे ६५ वे वर्ष आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फडणवीसांना वास्तवतेची जाणीव होणं गरजेचं; सतेज पाटलांचा टोला

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन; किरीट सोमय्या यांचं ट्वीट