राज्यासह मुंबई व पुण्यात कोरोनाचा विस्फोट सुरु असताना आता पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात 13 फेब्रुवारीला कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्याची खळबळजनक माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, पुणे शहरात 13 फेब्रुवारीला कोरोनाची दुसरी लाट आली. यावेळी 50 दिवसात 1250 रुग्णांची संख्या 46 हजारांवर पोहोचली होती. यावेळी कोरोनाचा प्रसार वेगाने झाला असल्याचे ते म्हणाले.
सध्या 6 हजार 500 लोक हॉस्पिटलमध्ये, त्यापैकी 555 रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर 4000 ऑक्सिजनवर आहेत. शहराचा पॉझिटिव्ह रेट हा जवळपास 28 टक्के असून तो कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे विक्रम कुमार यांनी सांगितलं. तसेच 21 मार्चला 3500 बेडस, 900 व्हेंटिलेटर, तर 2000 ऑक्सिजन बेड होते. 15 दिवसात यामध्ये दुप्पट वाढ केली, असंही त्यांनी सांगितलं.
Comments
Loading…