in

एकादशीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या करहरमध्ये कलम 144 लागू

प्रशांत जगताप | सातारा जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या करहर येथे आषाढी एकादशीनिमित्त येथे कलम 144 लागू करण्यात आला आहे. भाविकांनी शांतता राखण्याचे आवाहन उपअधीक्षक डॉ.शीतल जानवे यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या करहर येथे आषाढी एकादशी मोठी यात्रा भरते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आणि वारकरी संप्रदाय विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येत असतात. दरम्यान बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ वारकऱ्यांनी आषाढी एकादशी दिवशी गावागावातून वाऱ्या काढून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला होता.

कोरोना संसर्गामुळे आषाढी एकादशीला वारी होणार नसून ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत विधी पार पाडण्यात येणार आहेत.याच पार्श्वभूमीवर मेढा पोलिसांच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी करहर येथे रूट मार्च काढण्यात आला. एकादशी दिवशी करहर येथे कलम 144 लागू करण्यात आले असून भाविकांनी शांतता राखण्याचे आवाहन उपअधीक्षक डॉ.शीतल जानवे यांनी केलं आहे..

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra FYJc CET 2021 | ११वीच्या प्रवेशाची तारीख जाहीर, जाणून घ्या!

Pegasus spyware: ”केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची पदावरून हकालपट्टी करा”; काँग्रेस आक्रमक