in

गच्चीवरुन पूर पाहताना तोल गेला; महाडमध्ये पुराचा पहिला बळी

महाड शहरात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहराला पुराचा वेढा पडला असतानाच शहरात पुराचा पहिला बळी गेला आहे. गच्चीवरुन पुराच्या पाण्यात पडल्यामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गच्चीवरुन वाकून पाहत असताना तोल जाऊन खाली कोसळल्यामुळे 50 वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागले.

रायगड जिल्ह्यात महाड शहरातील रोहिदास नगर भागात ही घटना घडली. 50 वर्षीय संजय नारखेडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नारखेडे आपल्या इमारतीच्या टेरेसवरुन वाकून पाहत पुराच्या पाण्याचा अंदाज घेत होते. मात्र अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली कोसळल्याची माहिती आहे. महाडमधील खासगी रुग्णालयात संजय नारखेडे यांच्यावर उपचार सुरु होते.

कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं रायगडसह चिपळूण, राजापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाडमध्येही बाजरपेठेत आठ ते दहा फुटांवर पाणी साचले आहे. तटरक्षक दलाची २ पथकं महाडकडे रवाना झाली आहेत. कोलाड येथील महेश सानप यांचे पथकही महाडला रवाना झाले आहे. सावित्री नदीचे पाणी शहरात आल्यानं अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. रायगडमध्ये गेल्या २४ तासांत १६५. १८ मिमि पावसाची नोंद झाली आहे. तर, महाडमध्ये २०७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

रायगडमधील पावसाचे अपडेट्स

  • बाजीरे धरण (पोलादपूर) पहाटे 4 वाजता पाणी पातळी 58.30 मीटर, धरणाने धोक्याची पातळी (58 मीटर) ओलांडली
  • पोलादपूर शहरात जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर पाणी
  • पेण तालुक्यातील आपटा येथील पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
  • खालापुरातील सावरोली पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद.
  • पाली वाकण मार्गावरील वाहतूक बंद.
  • कर्जत खोपोली रेल्वे सेवा बंद.
  • नागोठणे येथे पूरस्थिती.
  • कुंडलिका, आंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास नदीच्या पातळीत वाढ.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंग यांच्यापाठोपाठ आता वरिष्ठ पोलिसांवर खंडणीचा गुन्हा

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी