in

Sensex Today : सेन्सेक्स थेट ६१ हजारांवर; निफ्टीनंही घेतली उसळी

मुंबई शेअर बाजारामध्ये आज सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठत बाजारात तेजी परतत असल्याचं दाखवून दिलं. त्यापाठोपाठ निफ्टीनं देखील विक्रमी झेप घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारामध्ये सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरात शेअर बाजाराने रोज नवनवे उच्चांक गाठले आहेत. गुरुवारी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सनं थेट ६१ हजारांच्या वर विक्रमी झेप घेतली. त्यामुळे खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या हालचाली दिसून आल्या.

यामध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी, एल अँड टी, एनटीपीसी, टाटा स्टील, मारुति सुझुकी, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, आरआयएल या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव चांगलाच वधारल्याचं दिसून आलं. मात्र, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एम अँड एम, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचटीएफसी, भारती एअरटेल आणि इंडसइंड बँक या कंपन्यांना शेअर्स वर ठेवण्यासाठी आज बराच काथ्याकूट करावा लागला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Price Today | आज परत सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री?

Gold and Silver rate today | काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर ?