in ,

इथे सेक्स विकला जातो!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रांचने अश्लील व्हिडीओ तयार करुन ते प्रसारित केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमध्येच एकच खळबळ उडाली.

HOTShots App च्या माध्यमातून सिनेमांच्या नावाखाली पोर्न तसेच B ग्रेड कन्टेंट बनवण्याचं काम चालत होतं. यामध्ये अनेक न्यू कमर्स अभिनेत्रींना मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याचं लालच दाखवून अश्लील व्हिडीओ तयार करुन घेतले जात होते.

इंटरनेटवर hotshotsप्रमानेच अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. हे अॅप्स यूझर्सना आकर्षित करण्यासाठी काही रुपये घेऊन महिन्याचं सबस्क्रीप्शन देतात. त्यामध्ये कसलीही स्टोरी आणि त्यात सॉफ्ट पॉर्न किंवा पॉर्न विकलं जाते. या उद्योगाची हजारो कोटी रुपयांची उलाढाल असल्याचं अनेक ॲप्स सध्या अशा प्रकारे सेवा देत आहेत.

HotShots सोबत Hothit, NewFlix हे काही आणखी असे ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत जे आपल्या कन्टेंटमुळे वादात सापडू शकतात. या ULLU या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अश्लील कन्टेन्ट असल्याचा आरोप केला जातोय. राज कुंद्रा प्रकरणात याआधी अटक केलेल्या अभिनेत्री गहन वशिष्टने निर्माती एकता कपूरचं नाव घेतलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pegasus Spyware | फोन टॅपिंग संविधान विरोधी; नाना पटोलेंचा केंद्रावर हल्लाबोल

कोल्हापूरात रेड अलर्ट जारी