in

शरद पवार यांनी केले ममता बॅनर्जींचं अभिनंदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.

आता हाती आलेल्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RR Vs SRH| राजस्थान रॉयल्सचा सनरायजर्स हैदराबादशी सामना; नेतृत्वबदल हैदराबादला तारणार का?

अखिलेश यादव यांचा ममता दीदींना शुभेच्छा देत भाजपावर निशाणा