मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडणार असून या बैठकीसाठी अजित पवार आणि जयंत पाटील दिल्लीला जाणार आहेत.
Comments
Loading…