in

Pratap Sarnaik Letter | शरद पवार दिल्लीला रवाना… राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या उर्वरित दौऱ्यांबद्दल अद्याप स्पष्टता नसून पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेऊन आले. याच दरम्यान, राज्यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीगाठी सुरू असतानाच पॉलिटिक्ट मॅनेजमेंट करणारे प्रशांत किशोर यांनीही पवारांची भेट घेतली. त्यानंतर राज्यभरात राजकीय हालचालींना उधाण आलंय.

सगळं काही अलबेल आहे, असं म्हणणाऱ्या महाविकास आघाडीतील नेते स्वबळाचा नारा देत आहेत. तर, शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपासोबत सोयरीक करण्याचं सुचवलं आहे. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडत असून येणाऱ्या काळात भाजपासोबत जुळवून घेण्याचा सल्ला यामध्ये देण्यात आलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाघिणीच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना अटक: वनविभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई

वारकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटणार राज्यपालांना… वारी संदर्भात संभ्रम कायम