मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून. या प्रकरणात गुंतलेल्या मोठ्या हस्ती आणि पोलीस अधिकाऱ्यांमुळे सर्वांचेचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.
शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
- परमबीर सिंह यांच्या पत्राचे २ भाग आहेत
- परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर .
- ‘त्या’ पत्रात परमबीर सिंह यांनी सही नाही.
- वाझेंना सेवेत पुन्हा घ्यायचा निर्णय परमबीर सिंह यांचा मुख्यमंत्री गृहमंत्र्याचा निर्णय नाही.
- पत्रात १०० कोटी कोणाकडे गेले याचा उल्लेख नाही
- पत्रात माझा उल्लेख – शरद पवार
- बदलीनंतरच परमबीर सिंह यांचे आरोप , पदावर असताना कोणतेही आरोप केले नाहीत
- एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी | लेटरबॉम्ब प्रकरणी शरद पवारांचा सल्ला
- आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे
- चौकशीअंती मुख्यमंत्री निर्णय घेतील.
- सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही
- माविआ सरकार स्थिर आहे.
- शिवसेनेसोबत आज बैठक नाही
- पत्रकार परिषदेआधी मुख्यमंत्र्याची चर्चा झाली
- हे प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनलं आहे.
- उद्या पर्यंत देशमुखांचा निर्णय घेऊ – शरद पवार
- सर्वांशी बोलून निर्णय घेतला जाईल
- फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र समोर आले आहे.
- बदलीआधी परमबीर सिंह यांच्या सोबत चर्चा झाली
- या चर्चेमध्ये माझ्यावर अन्याय होत आहे असं ते म्हणाले होते
- उद्या पर्यंत देशमुखांचा निर्णय घेऊ, परंतु त्याआधी त्याचं म्हणणं ऐकून घेऊ.
Comments
Loading…