in

फडणवीस दिल्लीत आल्यानंतर ‘हे’ पत्र समोर आलं – शरद पवार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले निघाले आहे. या प्रकरणात गुंतलेल्या मोठ्या हस्ती आणि पोलीस अधिकाऱ्यांमुळे सर्वांचेचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची बैठक बोलावली. यावेळी देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र समोर आले आलं असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी हे प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनलं आहे असे शरद पवार यांनी सांगितले. परमबीर सिंह यांच्या पत्राचे २ भाग असून, त्यांनी या पत्रामध्ये केलेले आरोप गंभीर आहेत. तसेच ‘त्या’ पत्रात परमबीर सिंह यांनी सही देखील नाही. वाझेंना सेवेत पुन्हा घ्यायचा निर्णय देखील परमबीर सिंह यांचा होता. या संदर्भात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचा काहीही संबंध नाही. त्याच प्रमाणे या पत्रात १०० कोटी कोणाकडे गेले याचा उल्लेख केला नाही. अशी माहिती देखील शरद पवार यांनी यावेळी दिली.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र समोर आले आहे. बदलीनंतरच परमबीर सिंह यांनी आरोप केले आहेत, पदावर असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचे आरोप केले नाहीत. याच पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांच्या बदलीआधी शरद पवारांसोबत त्यांची सोबत चर्चा झाली होती या चर्चेमध्ये माझ्यावर अन्याय होत आहे असं परमबीर सिंह म्हणाले होते, असा गौप्यस्फोट देखील शरद पवारांनी यावेळी केला. यासर्व प्रकरणी आता एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी असा सल्ला देखील शरद पवारांनी यावेळी दिला.

पत्रात केलेल्या सर्व आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशीअंती मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असे देखील ते यावेळी म्हणले. यासर्व प्रकरणाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नसून, माविआ सरकार स्थिर आहे. उद्या पर्यंत देशमुखांचा निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. परंतु या निर्णयाआधी गृहमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“शरद पवारांना आपलं सरकार वाचवायचंय”

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार फ्री-शीप