in

सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असे विधान केले होते. या विधानाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवत फडणवीस यांना सल्ला दिला आहे.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नावर भाष्य केले. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो, असं सांगतानाच सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दमदार स्पेसिफिकेशन्ससह ‘हा’ स्मार्टफोन लाँच

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टी व पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर