in

शरद पवारांकडून अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार

मुंबईत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणात भाजपने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सुद्धा हे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्यासाठी खोटं बोलत असल्याचा टोला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांना लगावला आहे.

सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषदेत बोलत होते. मुनगंटीवार यावेळी म्हणाले, अनिल देशमुख यांनी 15 फेब्रुवारीला एक पत्रकार परिषद बोलाविली होती आणि त्याचा दाखला हा त्यांच्याच ट्विटर अकाउंटवरती आहे. त्यामुळे शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्यासाठी खोटं बोलत आहेत, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.दरम्यान यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत देशमुख यांच्या वरती केलेले सर्व आरोप फेटाळले. गृहमंत्री अनिल देशमुख 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत घरी विलगीकरणामध्ये असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान रविवारी शरद पवार आधी म्हणाले की, अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. रात्री म्हणाले राजीनाम्याची आवश्यकता नाही म्हणजे अनिल देशमुखांनी त्यांना धमकी तर दिली नाही ना?,” अशी शंका मुनगंटीवार यांनी उपस्थित केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Covid Positive | कार्तिक आर्यनला करोनाची लागण

‘त्या’ दिवशी गृहमंत्री अनिल देशमुखांशी ऑनलाइन साधला संवाद, काँग्रेसकडून पुष्टी