पित्ताशयात खडे झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्रीच शरद पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान आता “शरद पवारांना चार ते पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळू शकेल. त्यांच्यावर पुन्हा एक सर्जरी करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे.
ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी केली जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पवारांची प्रकृती लवकर स्थिर झाल्यास ती लवकरही केली जाऊ शकते. डॉक्टरांनी १० दिवसांनी सर्जरी करणं योग्य ठरेल असं सुचवलं आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
Comments
Loading…