in

एका स्त्रीच्या पराभवासाठी संपूर्ण सत्तेचा वापर, पश्चिम बंगालवरून शिवेसनेची भाजपावर टीका

सध्या पश्चिम बंगालमध्ये महाभारत सुरू आहे. तिथे एका स्त्रीच्या पराभवासाठी भाजपाने संपूर्ण सत्तेचा वापर केला जात आहे, अशी टीका शिवसेनेने केली. पण या महाभारतात तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विजय होईल. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही देखील शिवसेनेने दिली.

नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगाल निवडणूक तसेच सचिन वाझेप्रकरणावरून भाजपावर सडकून टीका केली. ममता बॅनर्जी यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचाही पाठिंबा आहे. या निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्या तरी सत्तेची सूत्रे ममता बॅनर्जी यांच्याच हाती राहतील, असा दावा देखील त्यांनी केला.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ एका गाडीत सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा झालेला मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे. त्याबद्दलही राऊत यांनी टीका केली. मुंबई पोलीस दल सक्षम असताना एनआयएने एवढ्या घाईघाईने तपास हाती घेण्याची गरज नव्हती. पण विरोधी पक्षाचे सरकार राज्यात असल्याने केंद्राकडून अडचणी आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

शरद पवारांकडे संपुआचे नेतृत्त्व द्यावे
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे (संपुआ) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे द्यावे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केली. सध्या देशात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर (रालोआ) प्रमुख विरोधक म्हणून चांगली भूमिका निभावत आहे. काँग्रेसनेत्या सोनिया गांधी आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडले. मात्र आता आजारपणामुळे त्या राजकारणात फारशा सक्रिय नसतात. सध्या भाजपाविरोधात संपुआची ताकद कमी पडताना दिसत आहे. शरद पवार यांनी नेतृत्त्व केले, तर त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, असे संजय राऊत म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SACHIN VAZE ISSUE : महासंचालक परमबीरसिंह यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… 100 कोटींच्या वसुलीचे वाझेंना टार्गेट

SACHIN VAZE ISSUE : कारवाईपासून स्वत:ला वाचविण्यासाठी खोटा आरोप, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण