in ,

शिवसेनेनं वाहनचालकांना वाटले झंडू बाम आणि मास्क

रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून उडणारी धूळ यामुळे वाहनचालकांना त्रास होतो. शिवसेनेनं वाहनचालकांना होणाऱ्या या त्रासाविरोधात वाहनचालकांना चक्क झंडू बाम आणि मास्क वाटत आंदोलन केल्याचे दिसून आले. बदलापूरच्या खरवई परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

बदलापूरहून कर्जतकडे जाताना बदलापूर ते खरवई या पट्ट्यात रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत. याविरोधात अनेकदा तक्रारी करूनही काहीच काम झालेलं नाही. त्यामुळं अखेर शिवसेनेचे शिक्षण मंडळ सदस्य महेश जाधव यांनी वाहनचालकांना झंडू बाम आणि मास्कचं वाटप केलं.

खड्ड्यांमुळे नागरिकांना पाठीची दुखणी सुरू झाली असून खड्ड्यांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार जडले आहेत. त्यामुळे या दोन्हीपासून रक्षण करण्यासाठी झंडू बाम आणि मास्क वाटल्याचं महेश जाधव यांनी सांगितले. यापूर्वी याच रस्त्यासाठी दोन वेळा निधी मंजूर झाल्याची बॅनरबाजी करण्यात आली होती पण रस्त्याचं काम झालेलंच नाही या गोष्टाकडे त्यांनी लक्ष वेधलं. या आंदोलनाची बदलापुरात चर्चा रंगली असून आता तरी रस्त्याचं काम मार्गी लागतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर जाणून घ्या सोने- चांदीचे दर

पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ सुरुच, जाणुन घ्या आजचे दर