in ,

निलेश राणेंचा शिवसेनेला झटका;पंचायत समितीमधील शिवसेनेच्या तीन सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

समीर महाडेश्वर, सिंधुदुर्ग | सिंधुदुर्गमध्ये चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या श्रेय वादानंतर पुन्हा शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पहायला मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदूर्ग दौऱ्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला झटका दिला. कुडाळ पंचायत समितीचे शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केले असून. माजी पंचयात समिती सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला.

कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे १० संख्याबळ तर भाजपचे संख्याबळ ८ आहे. एक वर्षापूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तीन पंचायत समिती सदस्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे आता भाजपचे संख्याबळ 8 वरून ११ वर, तर शिवसेनेचे संख्याबळ १० वरून गेले ७ वर.हा आमचा पहिला झटका होता यानंतर तीन मोठे झटके निलेश राणे शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहेत.आणि मी झटका देणारा माणूस आहे असेही निलेश राणे म्हणाले. कुडाळ विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी माजी खासदार नीलेश राणे यांचे हे पहिले पाऊल असल्याचं संकेत मिळतायत. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे. त्याची मोर्चे बांधणीची हि सुरवात असल्याचा मानलं जात आहे. पक्ष प्रवेश केलेल्या सदस्यांनी आम्हाला हवातसा प्रतीसाद मिळाला नाही म्हणून आम्ही शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक पूर्णत बंद

पुष्पक एक्स्प्रेस दरोडा बलात्कार प्रकरण; सर्व आरोपींना अटक