in

अकोल्यात चॉकलेट वाटप करून शिवसेनेने केला पेट्रोल- डिझेल दरवाढीचा निषेध

राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. या दरवाढीने सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसत आहे. या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात अकोल्यात शिवसेनेने आंदोलन केले. तसेच पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनधारकांना चॉकलेट वाटप करून निषेध नोंदवण्यात आला.

अकोल्यात आज पेट्रोल शंभरी पार गेला आहे. आज शहरातील पंपावर पेट्रोल 101 रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री सुरू आहे. या वाढत्या दरवाढीने सामन्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे आज अकोल्यात शिवसेनेच्या वतीने शहरातील पट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करत पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना चॉकलेट देऊन केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात मोठया प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

सबका साथ सबका विकास असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता, मात्र यामध्ये सबका साथ आणि मोदीचा विकास होत आहे. मोदी सरकारला सामान्य नागरिकांची चिता नसून आपल्या सरकारची चिंता असल्याचे शिवसेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष राजेश मिश्रा यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धक्कादायक : पुण्यात घरफोड्या करणाऱ्या आरोपीस अटक, 15 गुन्हे उघडकीस

मत्स्य व्यवसाय तलावांच्या लिजला वर्षभराची मुदत वाढ