in

शिवसेना उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणार; संजय राऊत यांची माहिती

भाजपला मात देण्यासाठी शिवसेनेनं (Shivsena) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेनं उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. याबबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यात 20-21 तर उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 80 ते 100 जागा लढवणार असल्याच सांगितलं.

गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही 80 ते 100 जागा लढवू, असं सांगतानाच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करू शकतो. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो. उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितलं. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai

अंबरनाथ