in

“शिवसेनेतून मोठा झालेला हाच लबाड कोल्हा”, अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर आढळराव म्हणाले…

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकासकामांच्या श्रेयवादावरून खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळवराव यांच्यात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

काल अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी राज्य महामार्गाच्या बाह्यवळणाच्या रस्त्याचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी आढळराव यांना टोला लगावला होता. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यामागे शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर आता वाद उफाळून आला आहे.

यावर प्रत्युत्तर देताना शिवाजी आढळराव यांनी माध्यमांशी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “बायपास रस्त्याचं काम मी खासदार असताना सुरु झालं होतं. या कार्यक्रमाला मला डावलण्यात आलं. माझा, मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिथे नव्हता. मला या कार्यक्रमात बोलवावं एवढीच माझी अपेक्षा होती. कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलावं. स्थानिक विषयांत पवार आणि ठाकरेंचा प्रश्न येतो कुठे?”, असं आढळराव पाटील म्हणाले.

“थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय? असा प्रश्न आढळराव यांनी विचारला.

अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहेत. मी म्हातारा असलो, तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. समज आहे. यांच्यासारखा नटसम्राट नाही, अशा शब्दात आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘राज ठाकरे आश्वासक चेहरा’, चंद्रकांत पाटलांचा मनसे-भाजप युतीला दुजोरा?

राज्यात तिसरी लाट आली असे म्हणता येणार नाही – आरोग्य मंत्री राजेश टोपे