in ,

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली; ‘या’ ठिकाणी होणार मेळावा

शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. शिवसैनिकाचे (Shiv sena) लक्ष लागून असलेल्या दसरा मेळाव्याची (shiv sena dasara melava) जागा अखेर ठरली असून, यंदाचा दसरा मेळावा हा गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्येच होणार आहे. गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावापार पडणार आहे. 

दसरा मेळाव्याच्या जागेबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर यापूर्वीचे दसरा मेळावे होत असत. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. तर यावर्षी हॉलमध्ये ५० टक्के उपस्थितीत हा मेळावा साजरा होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘बंद संपूर्णत: यशस्वी; देशाची लढाई महाराष्ट्र लढतोय’

अनिल देशमुखांच्या नागपूरच्या घरी सीबीआयचे छापेमारी