in

पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचं वर्चस्व; सेनेला अध्यक्षपद तर राष्ट्रवादी उपाध्यक्षपदी

नमित पाटील | पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पदी सेनेच्या वैदही वाढाण तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असून पक्षांतर्गत ठरलेल्या धोरणानुसार सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने 7 जुलै रोजी भारती कामडी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर अतिरिक्त ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फटका बसल्याने उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते.त्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त झाली होती.

अध्यक्ष पदासाठी सुरेखा थेतले व वैदेही वाढाण यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सांबरे व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. परंतु सुरेखा थेतले व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर पालघर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पदी सेनेच्या वैदही वाढाण तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज ही निवडणूक पार पडली. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना आमदार रवींद्र फाटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा, माजी उपाध्यक्ष नीलेश सांबरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड आदी उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पक्षाचं निवडणूक चिन्ह फ्रिज करा, राष्ट्रवादीचा माफीनामा!

पैठणमध्ये दिव्यांगांसाठी लसीकरण सुरू