in

व्हायरल व्हिडीओ| धक्कादायक! दोघांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह फेकला नदीत

उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण एक मृतदेह पुलावरून नदीपात्रात फेकताना दिसत आहेत. मृतदेह फेकणाऱ्या दोघांपैकी एकानं पीपीई किट घातला आहे. सिसई घाटावर असलेल्या पुलावर हा धक्कादायक प्रकार घडला असून इथून जाणाऱ्या एका वाहन चालकानं तो मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.

व्हिडीओत पीपीई किटशिवाय दिसणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून त्याचं नाव चंद्र प्रकाश आहे. तो स्मशानघाटावर काम करतो. काही लोकांनी मला पुलावर बोलावलं होतं आणि मृतदेह खाली फेकला होता, असं प्रकाशनं सांगितलं. ‘काही लोक आले आणि त्यांनी मला पुलावर नेलं. मी पुलाच्या दुसऱ्या टोकाला उभा होतो. तेव्हा एका तरुणानं बॅगेची चैन उघडून दगड टाकला आणि मला बोलावलं. त्यानंतर नदीत मृतदेह टाकून परत गेला. अशी महिती चंद्र प्रकाश यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी ‘संवाद’

कोरोना नियमांचे तीनतेरा, बैलगाडी शर्यती सुरूच