in ,

”राज्यात ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा जाणवणार”…अखेर मंत्र्यांचीच ग्वाही

रेमडेसिवीरचं इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज 12 हजार ते 15 हजार एवढं कमी मिळालेलं आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार असल्याची माहिती अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेमडेसिवीरचा साठा वाढवण्याबाबत चर्चा झाली. या बैठ्कीनंतर राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीरचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत बैठक घेतल्याची माहिती दिली. त्यावेळेस मला त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता. त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्रात ५५ हजार रेमडेसिवीर पुरवतील अशी ग्वाही दिली.

गुरुवारपर्यंत 37 ते 39 हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवले असल्याची माहिती त्यांनी दिली.ही सर्व आकडेवारी पाहता व दररोज रूग्णांची संख्या वाढत असताना आणि रूग्णांना रेमडेसिवीर देण्याच्या दृष्टीने आपण आपल्याला प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. त्यानुसार त्यांची व माझी चर्चा झालेली आहे. १९-२० एप्रिल नंतर हा पुरवठा सुरळीत होईल, अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे.” असं डॉ. शिंगणे म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंडे भावा बहिणीत रंगला ट्विटरवॉर; तुम्हाला हक्क आहेच भाऊ !

आधी चक्कर..आणि त्यानंतर मृत्यू; नाशकात रहस्यमय आजाराने ९ जणांचा मृत्यू