in

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला नागपुरातून अटक

बहुचर्चित दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने नागपुरात बुधवारी उशिरा रात्री ही कारवाई केली.

सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी हे आरोपी असून सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाईदेखील केली आहे, तर अमरावती ग्रामीण पोलिसांनी दिपाली चव्हाणच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली रेड्डी यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून रेड्डी अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होते, तर अमरावती पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत होते. बुधवारी दुपारपासून त्यांचे लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांची चमू नागपुरात दाखल झाली. त्यांनी गुन्हे शाखा तसेच स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरा शहरातील एका हॉटेल जवळ ते दिसल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची नागपुरात जुजबी नोंद केल्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले. या संबंधाने अमरावती ग्रामीण पोलिसांच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पुनम पाटील यांच्याकडे लोकमतने विचारणा केली असता, त्यांनी रेड्डींना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाण्यात आज लसीकरण बंद!

खळबळजनक : ४८ मुलींसह ९ शिक्षकांना कोरोनाची लागण