in

तेलाच्या टँकरमध्ये भीषण स्फोट; 91 नागरिकांचा मृत्यू

आफ्रिकन देश सिएरा लिओनची Sierra Leone राजधानी फ्रीटाऊन Freetown येथे झालेल्या भीषण स्फोटात 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तेल टँकरमध्ये भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शहरातील सर्वात वर्दळीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका ऑइल टँकरला दुसऱ्या वाहनाची धडक बसल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक बातम्यांनुसार, स्फोटाच्या परिसरात प्रचंड काळा धूर आणि लोकांचे मृतदेह दिसत होते. घटनास्थळी मदत आणि बचावासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रपतींनी व्यक्त केले शोक;
सिएरा लिओनचे अध्यक्ष, ज्युलियस माडा बायो यांनी सांगितले की, या आगीमुळे आणि मोठ्या जीवितहानीमुळे ते खूप व्यथित झाले आहे. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, सरकार पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करेल.

100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती;
या स्फोटात 100 हून अधिक लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप या संख्येला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. असे असूनही, घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने स्थानिक वृत्तवाहिन्यांनी 90 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. सरकारी व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 91 जणांचे मृतदेह शवगृहात नेण्यात आले आहेत.

रुग्णालयांमध्ये उपचारासाठी शेकडो लोक दाखल;
देशाचे उपआरोग्य मंत्री अमरा जांबई यांनी सांगितले की राजधानीतील रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये 100 हून अधिक लोकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिएरा लिओनच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सीचे प्रमुख ब्रिमा बुरेह सेसे यांनी स्थानिक मीडियाला सांगितले की ही घटना “अत्यंत भयंकर” होती.

What do you think?

-4 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ahmednagar Hospital Fire; अहमदनगर शासकीय रुग्णालयातील आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Ahmednagar Hospital Fire; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा