in

सोने व्यापारात जून 2021 पासून होणार महत्त्वाचे बदल

भारतात सोनेखरेदी शुभ मानली जाते. लोक सणासुदीला, शुभमुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करण्यावर भर देतात. त्यामुळे भारतात सोन्याची मागणी प्रचंड असते. दरवर्षी देशात 700 ते 800 टन सोन्याची आयात होते.

नोव्हेंबर 2019 मध्ये सरकारनं सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्किंग अनिवार्य केलंजाईल, असं जाहीर केलं. मात्र कोरोना साथीमुळे ही मुदत एक जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली. सरकारनं सराफ व्यावसायिकांना हॉलमार्किंगची तयारी करण्यासाठी आणि भारतीय मानक ब्युरोमध्ये (BIS) नोंदणी करण्यासाठी दीड वर्षापेक्षा अधिक वेळ दिला आहे.

त्यामुळे ही मुदत आणखी वाढवण्यास सरकारनं स्पष्ट नकार दिला असून, लवकरात लवकर सराफ व्यावसायिकांनी भारतीय मानक ब्युरोमध्ये (BIS) नोंदणी करावी असं आवाहन केलं आहे. हॉलमार्क अनिवार्य झाल्यानंतर एक जूननंतर देशभरातील दागिन्यांच्या बाजारपेठेत केवळ हॉलमार्क असलेले 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील. यामुळं ग्राहकांची फसवणूक टळेल. त्यांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील.

ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन म्हणाल्या की, भारतीय मानक ब्युरो सध्या सराफ व्यावसायिकांच्या हॉलमार्किंग नोंदणीला मंजुरी देण्यात व्यस्त आहे. भारतीय मानक ब्युरोचे संचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले की,आम्ही एक जून 2021 पासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्यास सज्जआहोत. याची मुदत वाढविण्याबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आतापर्यंत देशातील 35 हजारांहून अधिक सराफ व्यावसायिकांनी नोंदणी केली असून, पुढील एक-दोन महिन्यांत हाआकडा एक लाखांवर जाईल, अशी अपेक्षा आहे.’

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मोदी सरकारच्या काळात माध्यमांची मुस्कटदाबी’

Maharashtra Lockdown | गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही होणार बंद!