in

जेजुरीच्या खंडोबाला चांदीचा रत्नजडित हार अपर्ण

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरी गडावरील मार्तंड भैरवाच्या मूर्तीला अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण करण्यात आला आहे.आपल्या आईची राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी लोढा कुटुंबीयांनी विधिपूर्वक खंडोबाला हार अर्पण केला.

खंडोबा देवस्थानचे विश्वस्त राजकुमार कांतीलाल लोढा यांनी त्यांच्या मातोश्री दिवंगत कमलाबाई लोढा यांच्या इच्छेनुसार हा हार अर्पण केला असल्याची माहिती लोढा यानी दिली आहे. यावेळी विश्वस्त राजकुमार लोढा त्यांच्या पत्नी विद्या, मुलगा सुमित उपस्थित होते. अर्पण करण्यात आलेला शुद्ध चांदीचा रत्नजडित हार मार्तंड भैरवाच्या मूर्तीला साजेसा बनवण्यात आला आहे. राजस्थानमधील कुशल कारागिरांनी हा हार तयार केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकऱ्यांनो, १७ जूनपर्यंत पेरण्या टाळा कृषि विभागाचे आवाहन

मुंबईसह कोकणात पुढचे 5 दिवस महत्त्वाचे