in

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेचे जरा हटके होर्डिंग

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दोन्ही पर्वाला रसिकांची पसंती मिळाली होती. ‘रात्रीस खेळ चाले ३’ सुरु झाल्यापासून रसिकांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मात्र रसिक मालिकेत शेवंता आणि अन्ना नाईक या पात्रांना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

आता त्याच पाठोपाठ अन्ना नाईकही रसिकांना धडकी भरवण्यासाठी येणार आहेत. सध्या अन्ना नाईक आणि शेवंता यांच्याकडेच सा-यांचे लक्ष लागलेले असताना, मालिकेचे हटके प्रमोशन करत उत्सुकता आणखी वाढवली जात आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या प्रोमोशनसाठी एक नवीन आयडीयाची कल्पना लढवली गेली आहे, एक असं होर्डिंग बनवलं गेलं की ते फक्त आणि फक्त रात्रीच दिसेल. जशी काही भूत रात्रीच दिसतात तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Second Wave Corona; पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फरक काय ?

लॉकडाऊन न हटवल्यास रस्त्यावर उतरणार; खा. नवनीत राणा यांचा सरकारला इशारा