in

नाशिक | रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल

नाशिकमध्ये नामांकित हॉस्पिटलने अवाजवी बिल आकारल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केलं. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला वाढीव बिल देण्यात आल्याचा आरोप जितेंद्र भावे यांनी केला. याविरोधात त्यांनी रुग्णालयातच शड्डू ठोकला. पण गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करणं जितेंद्र भावेंना महागात पडलंय.

मुंबई नाका पोलिसांनी जितेंद्र भावे यांना ताब्यात घेतलं. दरम्यान, जितेंद्र भावे यांना पोलिसांनी सोडावं, या मागणीसाठी पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली. रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत पोलीस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; सट्टेबाज सोनू जालानचा जबाबात मोठा गौप्यस्फोट

Cyclone Yaas : चक्रीवादळाचा मोर्चा झारखंडकडे…तर, ओडिशात लँडफॉल!