in ,

कोरोना स्थितीवरून सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाल्या…

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

काही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली जावी, असं मत व्यक्त केलं आहे. कोरोनाविरोधातील लढाईत परिणामकारक निकालासाठी लसीला प्राधान्य देण्याच्या धोरणाची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
देशांतर्गत लस उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. तसंच आवश्यक परवानग्या असलेल्या सर्व उमेदवारांना आपत्कालीन वापरास परवानगी देणं सुज्ञपणाचं असेल, असं सोनिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

लस हीच सध्या सर्वात मोठी आशा आहे. अनेक राज्यांमध्ये केवळ ३ ते ५ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे, अशी चिंताही सोनिया यांनी व्यक्त केली.

लसीकरण वयाच्या नाही तर गरजेच्या आधारे केलं पहिजे असं मत सोनिया यांनी व्यक्त केलं. विषाणूजन्य संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांना वस्तू व सेवा करातून सूट मिळणे आवश्यक असल्याचंही त्या म्हणाल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Remedesivir | अहमदनगर जिल्ह्यातील म्हस्के हॉस्पिटलवर छापा

लॉकडाऊनच्या भीतीनं LTT स्थानकावर परप्रांतीयांची मोठी गर्दी