in

तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव

भारत आणि दक्षिण अफ्रिकामधल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. तिसऱ्या कसोटीमध्ये दक्षिण अफ्रिकेने ७ गडी राखून सामना जिंकला. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाचं दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.

पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमावून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकच्या संघाने सर्वबाद २१० धावा केल्या. भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांच आव्हान ठेवल होतं. मात्र या धावसंख्येपुर्वीच भारत आफ्रिकेला रोखेल अशी शक्यता होती. मात्र दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला.

एडन मारक्रमने २२ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर डीन एल्गार आणि किगन पीटरसननं पुढील मालिका सांभाळली. मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर डीन ३० धावा करून परतला. किगन आणि दुस्सेननं तिसऱ्या गड्यासाठी मोठी भागीदारी केली. मात्र किगन ८२ धावांवर असताना शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर आउट झाला. त्यानंतर रस्सी वॅन दर दुस्सेन आमि टेम्बा बवुमा या जोडीनं विजय मिळवून दिला. रस्सी वॅन दर दुस्सेन याने नाबाद ४१ आणि टेम्बा बवुमा नाबाद ३२ धावा केल्या.

तिसऱ्या आणि शेवटच्या निर्णायक कसोटीमध्ये दक्षिण अफ्रिकेने ७ गडी राखून सामना जिंकला. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाचं दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काका विरुद्ध पुतणे संघर्ष पुन्हा ताणला; महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रिय, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची जहरी टीका

मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण