in

‘सोयरिक’ लवकरच जुळणार…

बहुरूपी प्रोडक्शन आणि ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन यांची निर्मिती असलेला मकरंद माने लिखित दिग्दर्शित ‘सोयरिक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौटुंबिक आशयाचा या मनोरंजक चित्रपटाचा मुहूर्त अकलूज येथे संपन्न झाला. अनेक नामवंत कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार. यामध्ये विजय शिंदे, शशांक शेंडे, आणि दिग्दर्शक मकरंद माने यांनी आपली सोयरिक पुन्हा जुळवून आणली असून ‘पोरग मजेतय’ या चित्रपटाच्या निर्मिती नंतर ‘सोयरिक’ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकत्र आले.

लग्न म्हणजे दोन जीवांसोबतच दोन कुटुबांचे ही मिलन त्यासंबंधावरच सोयरिक जुळून येत असते. तेच मांडायचा आम्ही प्रयत्न आम्ही करत आहोत असे दिग्दर्शक मकरंद माने सांगतायत.

रिंगण, कागर, यंग्राड या तिघा चित्रपटांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर “पोरग मजेतय” हा चित्रपट विजय शिंदे, शशांक शेंडे, यांच्या साह्याने निर्माण केला होता. त्यांच्या रिंगण या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. २०१८ मध्ये आलेला कागर हा सिनेमा लोकप्रिय ठरला, त्यानंतर आपल्या चित्रपटांतून सामाजिक विषयाला हात घालणारे आता दिग्दर्शक मकरंद माने ‘सोयरीक’ या चित्रपटातून नात्यांची मनोरंजक सफर प्रेक्षकांना घडविणार आहेत. या चित्रपटाबद्दल निर्माते विजय शिंदे, मकरंद माने, शशांक शेंडे उत्सुक असून काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास देखील या तिघांनी व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्र सरकारचा निषेध; महागाई विरोधात काँग्रेसकडून सायकल रॅली

… हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना?