in

स्पुटनिक लाइटचा मार्ग मोकळा होणार?

स्पुटनिकच्या सिंगल डोस लसीच्या भारतीयांवरील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून मंजुरी मिळाली आहे. स्पुटनिक लाइट असं या लसीचं नाव असून लवकरच चाचण्या सुरू केल्या जातील. ३० जून रोजी स्पुटनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची गरज नाकारण्यात आली होती. त्यानंतर, विषय तज्ज्ञ समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तज्ज्ञांच्या पॅनेलने हैदराबादस्थित डॉ. रेड्डी यांना ५ ऑगस्ट रोजी चाचणी घेण्यास परवानगी दिली होती.

फार्मा कंपनी पॅनेशिया बायोटेकने तयार केलेल्या स्पुटनिक लाइटचे नमुने आधीच गुणवत्ता, सुरक्षा तपासणीसाठी कसौली येथील सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले गेले आहेत, तर हॉस्पिटलमध्ये ट्रायल साइट्स सेट करण्यासाठीही पोहोचले आहेत. या चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिल्लीतल्या कारवाईनंतर महाराष्ट्र ‘अलर्ट मोड’वर; गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक

OBC Reservation ओबीसी आरक्षण : राज्यभरात भाजपाकडून तीव्र आंदोलनं